प्रतिनिधी/ उस्मानाबाद
तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथे शेतातील बांधावरील माती नेण्याच्या कारणावरून चौघांनी मारहाण केली. हा प्रकार गुरुवारी (दि. २५) सायंकाळी पाच वाजता घडला.
अनिल मुकुंद तांबे घरासमोर उभारले असताना तेथे संतोष धनके, विक्रम धनके, आकाश धनके, ज्ञानेश्वर धनके (सर्व रा. कुंभारी) तेथे आले. शेतातील बांधावरील माती घेऊन जाण्याबाबत त्यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यामध्ये चौघांनी काठीने अनिल तांबे यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. विक्रम धनके याने दगडाने पाठीत मारहाण केली. आकाश धनके व ज्ञानेश्वर धनके यांनी लाथाबुक्यांनी मारहान करुन शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. यामध्ये तांबे गंभीर जखमी झाले. त्यांनी रुग्णालयात उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून तुळजापुरात गुन्हा दाखल झाला. 
 
Top