उस्मानाबाद/प्रतिनिधी
कल्याणसागर माध्यमिक विद्यालय परंडा ची विद्यार्थीनी व कल्याणसागर परिवाराचे सदस्य श्री कृष्णा चैतन्य यांची मुलगी कु. अनुजा चैतन्य हीची थॉट वर्कस कंपनी चैनई येथे सॉफ्टवेअर डेव्हलपर या पदावर निवड झाल्या बद्दल कल्याणसागर समूहाच्या सचिव सौ. प्रज्ञाताई कुलकर्णी यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.
कु. अनुजाचे इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण परंडा येथे झाले. इयत्ता दहावी नंतर पुरनमल लाहोटी शासकीय तंत्र निकेतन,लातूर येथे तंत्र निकेतनचे शिक्षण घेत असताना कॅम्पस इंटरव्हयू मध्ये तिची गुणवत्तेवर निवड झाली.
सत्कार प्रसंगी कल्याणसागर समुहाचे मार्गदर्शक विकास कुलकर्णी, कल्याणसागर बॅंकेचे चेअरमन श्री अजित पाटील, नगरसेवक श्री मकरंद जोशी, पत्रकार श्री आनंद खरडेकर, श्री प्रमोद वेदपाठक, सौ. अक्षदा पाटील, अनुजाचे वडील श्री कृष्णा चैतन्य उपस्थित होते. अनुजाच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.