प्रतिनिधी /उस्मानाबाद
शहरातील दोन ठिकाणी रहदारीला अडथळा येऊन अशा पद्धतीने अॉटोरिक्षा उभे करून प्रवासी जमवणाऱ्या दोन रिक्षाचालकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. २६) करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हा मध्यवर्ती प्रशाकीय इमारत रस्त्यावर जिल्हा न्यायालयासमोर उस्मानाबाद येथे इरफान आश्रफ पठाण (रा. गालीबनगरा, उस्मानाबाद) याने त्याच्या ताब्यातील अॅटोरिक्षा (क्र. एमएच २५, ए. के. ०६१४) तसेच बसस्थानकासमोर आशिष तानाजी भोसले (रा. शेकापूर, ता. जि. उस्मानाबाद) याने त्याचे ताब्यातील रिक्षा (क्र. एमएच २५, सी. ५६८७) थेट रस्त्यावर रस्त्यावर उभा केला होता. त्यावेळी दोघांनी कोणालाही बाजू दिली नाही. यामुळे लोकांना व रहदारीस अडथळा निर्माण होवुन मानवी जिवीतास धोका निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. नागरिकांनी याची माहिती पाेलिसांना फोनवरून सांगितल्यावर पठाण व भोसले यांच्याविरुध्द आनंदगनर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्य रस्त्यावर ऑटोरिक्षा उभी करून प्रवासी घेण्याचा प्रकार 
 
Top