उस्मानाबाद/प्रतिनिधी
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खरीप हंगाम 2018 चा पीकविमा मंजूर केला. जिल्ह्यातील 6 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीकविमा अंतर्गत 537 कोटीहून अधिक मंजूर झाला आहे. भरघोस विमा जाहीर केल्याबद्दल भाजपने केंद्र व राज्य शासनाचे आभार मानले आहेत.
भाजपने म्हटले आहे की, शेतकरी दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. 2018 चा पर्जन्यमान टक्केवारीपेक्षा कमी झाल्यामुळे खरीप हंगामही वाया गेल्याने जिल्ह्यातील लाखो शेतकरी हे हवालदिल झाले होते.यामुळे आर्थिक अडचणीतील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष खरीप 2018 च्या पीक विम्याकडे लागले होते. सततची दुष्काळी परिस्थिती व जिल्ह्यातील वाढत्या आत्महत्या या पार्श्वभूमीवर खरीपाचा पीकविमा हा तातडीने मिळावा अशी मागणी भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांनी केली होती. राष्ट्रवादी कॉंगेसच्या काळात अगदी नगण्य पीक विमा मिळाला असून त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने विक्रमी पीक विमा हा भाजपा सरकारच्या काळात शेतक-यांना मिळाला आहे.

 
Top