प्रतिनिधी / उस्मानाबाद
कारने दुचाकीस धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना २४ एप्रिल रोजी घडली असून बेंबळी पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि.२५) गुन्हा नोंद झाला.
लातूर ते तुळजापूर जाणाऱ्या रोडवर भंडारी शिवारात देविदास व्यंकट नेडगुंडे (रा.ईस्लामवाडी ता.देवणे जि.लातूर) याने त्याच्या ताब्यातील ओमनी कार (क्र. एम.एच. १४ बी.आर. ७८०४) हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवून माणिकलाल अब्दुल बागवान (रा. माताजी नगर लातूर) यांच्या दुचाकीला (क्र. एम.एच. २४ एक्स ३४०६) जोराची धडक दिली. यामध्ये माणिकलाल अब्दुल बागवान यांचा मृत्यू झाला. तसेच बागवान यांची पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाल्या. तसेच दुचाकीचे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी ईस्माईल हुसेनसाब बागवान (रा. वसवाडी स्वराज नगर पाखरसांगवी, लातूर) यांच्या फिर्यादीवरून देविदास व्यंकट नेडगुंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 
 
Top