उस्मानाबाद/प्रतिनिधी-
माहेरहून घर बांधण्यासाठी पैसे आण म्हणून विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि.२५) सासरच्या मंळडीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. फिर्यादी महिलेचे लग्न सुधीर भिमराव गाडे याच्यासोबत झाले होते. मात्र २५ डिसेंबर २०१२ पासून सुधीर गाडे (पती), भीमराव गाडे (सासरे), सचिन गाडे (दीर), सासू (सर्व रा. आंदोरा ता.कळंब) व उमेश भीमा साळवे व एक महिला (दोघे रा.धनकवडी पुणे) यांनी संगनमत करून विवाहितेस घर बांधणीसाठी व इंडिका कार घेण्यासाठी तुझे आईवडिलांकडून ३ लाख २५ हजार रुपये घेऊन ये, असे कारण काढून मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच शिवीगाळ व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून वरील आरोपींविरुध्द गुन्हा दाखल झाला. 
 
Top