उस्मानाबाद /प्रतिनिधी-
कळंब येथील कसबा गल्लीतून सोन्यासह रोख २० हजार ९०० रुपयांच्या चोरीच्या दोन घटना दि. २५ ते २६ एप्रिल दरम्यान घडल्या. याप्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. कसबा गल्ली शिवाजीनगर कळंब येथे नितीन बिभीषण गाडे यांच्या घराच्या मुख्य दरवाज्याची कडी तोडून घरातील स्टोअर रूमचा दरवाजा उघडुन कपाटामधील रोख रक्कम १५ हजार रुपये व बालाजी गरड यांच्या घराच्या बाहेरील रूमच्या दरवाज्याची कडी तोडून घरातील पाच हजार रुपये. तसेच सोन्याचे अर्धा ग्रॅम वजनाचे सहा मनी ९०० असा एकूण २० हजार ९०० रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने चोरुन नेला. याप्रकरणी नितीन गाडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला.