प्रतिनिधी /उस्मानाबाद
|
निवडणूक निरीक्षक पी.सुधाकर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांनी केलेल्या खर्चाची ताळमेळ बैठक झाली. यावेळी निवडणूक खर्च नियंत्रण समिती कक्ष प्रमुख शेखर शेटे, उपप्रमुख किरण घोटकर, कवठे, बोंदर, साखरे,लीड बँक व्यवस्थापक नीलेश विजयकर हे उपस्थित होते. या बैठकीत लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमधील उमेदवारांनी आतापर्यंत केलेल्या खर्चाचा ताळमेळ तपासला गेला. यामध्ये मुख्यतः उमेदवाराने केलेला खर्च आणि निवडणूक खर्च नियंत्रण कक्षाकडे नोंदविलेला खर्च याचा ताळमेळ तपासण्यात आला. यावेळी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, विधानसभा मतदारसंघनिहाय सहायक निवडणूक खर्च निरीक्षक उपस्थित होते. या खर्चामध्ये मुख्यतः उमेदवारांनी केलेलला दैनंदिन खर्च, बँकांमार्फत केलेला खर्च आणि रोख स्वरूपात केलेला खर्च याबाबतची तपासणी करण्यात आली. अशा प्रकारच्या एकूण ४, १० आणि १६ एप्रिल अशा तीन दिवशी निवडणूक खर्च ताळमेळ बैठका होणार आहेत. |