प्रतिनिधी/ उस्मानाबाद
हॉटेलचे बिल का दिले नाही, असे म्हणत एकास मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.१) घडली असून गुरुवारी (दि.५) दोघांविरुद्ध आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. बालाजी सुभाष कोळी उपळा (मा) येथून सांजाकडे जात असताना रणजित सूर्यवंशी, दीपक सूर्यवंशी (दोघे रा. उस्मानाबाद) यांनी कोळी यांना हॉटेलचे बिल का दिले नाही, रॉडने मारून जखमी केले तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली. याबाबत बालाजी कोळी यांच्या एमएलसी जबाबावरून वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 
 
Top