येडशी/प्रतिनिधी-
येथील सनराईज इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भारतीय प्रज्ञाशोध परिक्षेत राज्यस्तरावर घवघवीत यश मिळविले आहे. 20 जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या या परिक्षेत शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे.
सनराईज या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्य, जिल्हा व केंद्र स्तरावर यश संपादित करुन शाळेच्या नावलौकीकात भर टाकल्याबद्दल मुख्याध्यापक जी. आर. देशमुख यांच्यासह शिक्षकांचे अभिनंदन केले जात आहे. राज्याच्या गुणवत्ता यादीत बारा, जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत 23 तर केंद्राच्या गुणवत्ता यादीत 13 विद्यार्थ्यांनी सुयश संपादीत केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक गणेश देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.