उस्मानाबाद -
रामनवमीनिमित्त शहरातील समर्थनगर येथील श्रीराम मंदिरात ६ ते १४ एप्रिल या कालावधीत सप्तहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त श्रीराम मूर्तीस महाभिषेक, विविध मान्यवरांचे कीर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत. रविवारी (दि़१४) रामनवमी निमित्त काल्याच्या किर्तनानंतर सप्ताहची सांगता करण्यात येणार आहे़
रामनवनिमित्त गुढीपाडवादिवशी शनिवारी (दि. ६) श्रीराम मूर्तीस महाभिषेक करण्यात येणार आहे़ रविवारी (दि़७) व सोमवारी (दि़ ८) रात्री ८ ते १० दरम्यान गंगाखेड येथील बाळु महाराज नव्हेकर यांचे कीर्तन होणार आहे़ मंगळवारी (दि. ९) डॉ़ श्रीकांत देशपांडे, बुधवारी (दि. १०) संगीत मंडळाचा सुगम संगीताचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी (दि. ११) श्रीराम बुवा रामदासी, शुक्रवारी (दि. १२) पांडुरंग लोमटे महाराज यांची किर्तन सेवा होणार आहे़ शनिवारी (दि. १३) रामनवमीनिमित्त लातूर येथील अमित जोशी यांचे काल्याचे किर्तन होणार आहे़ रविवारी (दि. १४) भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे़ कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे़