लोहारा/प्रतिनिधीलोहारा तालुक्यात लघु पाटबंधारे विभागात कनिष्ठ अभियंता पदावर गेली 31 वर्ष अति उत्कृष्ट सेवा करुन अरुण सारंग सेवानिवृत्त झाल्याने यांचा सहपत्नीक लोहारा शहरात लघु पाटबंधारे उपविभाग उमरगा यांच्यावतीने यथोचित
सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग होते. तर प्रमुख म्हणुन लघु पाटबंधारे विभागाचे जलसंधारण अधिकारी ई.टी.सुर्यवंशी, तालुका ग्रामिण पाणी पुरवठा कार्यालयाचे कनिष्ठ सहाय्यक एस.डी.गडेवार, आर.आर.संगम, चक्रधर कदम, दिपक रणखांब, नेताजी शिंदे, अदि, उपस्थित होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग व जलसंधारण अधिकारी ई.टी. सुर्यवंशी यांनी अरुण सारंग यांचा उत्कृष्ट कामाचा लेखा जोखा मांडला. या कार्यक्रमास नागरीक,अधिकारी, कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.