उस्मानाबाद /प्रतिनिधी बहुजन योद्धा सामाजिक संस्था, सम्राट नाट्य संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती अध्यक्षपदी रवी कोरे यांची निवड झाली. मार्गदर्शक धनंजय शिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपाध्यक्षपदी भाई फुलचंद गायकवाड, रफिक टकारी, सचिव नितिन शेरखाने, कोषाध्यक्ष विशाल शिंगाडे, सहसचिव बापू माने, मिरवणूकप्रमुख राहुल बनसोडे, नितेश जानराव स्वप्निल शिंगाडे, बापू काकडे, सिद्धार्थ सोनवणे, सिद्धार्थ सिरसाठ यांची निवड करण्यात आली आहे. दि. २० एप्रिल रोजी मिरवणूक काढण्यात येणार आहे. |