उस्मानाबाद प्रतिनिधी-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उस्मानाबाद उप परिसर येथे शहिद दिनानिमित्त शनिवारी (दि. २३) क्रांतिवीर भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. 
 मुख्य प्रशासकीय इमारतीत हा कार्यक्रम झाला. यावेळी संचालक डॉ अनार साळुंके, उपकुलसचिव आय आर मंझा, विद्यार्थी कल्याण समन्वयक डॉ. महेश्वर कळलावे, डॉ. सुयोग अमृतराव, संजय शिंदे, डॉ. प्रशांत  दीक्षित, डॉ जितेंद्र कुलकर्णी, डॉ नितीन पाटील, डॉ जितेंद्र शिंदे, प्रा वरूण कळसे, प्रा विक्रम शिंदे, कक्षाधिकारी विद्याधर गुरव, अतुल पवार आदींसह कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.  
 
Top