..
परंडा प्रतिनिधी =जवळा(नि) जि. प. प्रा.शाळा घारगाव(ता. परांडा) येथे विद्यार्थी हस्तलिखिताचे शालेय व्यवस्थापन समिती सदस्य दीपाली लटके यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मध्ये सुंदर हस्ताक्षराला प्रोत्साहन देणे, लेखनाची आवड निर्माण करणे या हेतूने तयार केलेल्या हस्तलिखितामुळे मुलांना बहुवाचिक शैक्षणिक अनुभव समृद्ध झालेला दिसून येतो. 
    या हस्तलिखितात स्त्री-भ्रूण हत्या, अंधश्रद्धा, इंटरनेट शाप की वरदान, जीवन, माझे आवडते पुस्तक, आवडता लेख, गोष्टी, विनोद, विज्ञान जगत, छोट्या कविता,आजचे शिक्षण, माझा गाव, माझी शेती, माझी आजी, शेतकरी, आई बद्दल लेख व काव्याचा समावेश आहे. ग्रामीण भागातील मुलांनी तयार केलेल्या या हस्तलिखितात ग्रामीण भागातील जनजीवन कल्पकतेने मांडले आहे,मराठी, इंग्रजी विभाग, कलाकुसर, माझं चित्र, बातमीपत्रातून काजवा हस्तलिखित तयार झाले आहे.
  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदू लटके तर प्रमुख पाहुणे म्हणून राहुल काकडे हे उपस्थित होते. यावेळी सचिन सुरवसे, वंदना लटके, दैवशाला वाघमारे, चंद्रकला वाघमारे यांच्यासह काजवा चमू प्रगती लटके, श्रुती सुरवसे, पूनम लटके, विवेक काळे, सौरभ उमाप, समीक्षा काकडे उपस्थित होते.

x

 
Top