तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी टेंभुर्णी येथील भाविक राणी मुकुंद अटकळे यांच्याकडून 707 ग्रॅम वजनाचा चांदीचा टोप (मुकुट) आज दिनांक 01 नोव्हेंबर रोजी भक्तिभावाने अर्पण करण्यात आला.
सदर चांदीचा टोप मंदिर परिसरातील धार्मिक कार्यालय येथे आवश्यक नोंद करून मंदिर संस्थानकडे जमा करून घेण्यात आला. यावेळी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने भाविकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मंदिर संस्थानचे सहायक जनसंपर्क अधिकारी उमाकांत क्षीरसागर, पुजारी विक्रम कदम तसेच कर्मचारी व पुजारीबांधव उपस्थित होते.
