धाराशिव (प्रतिनिधी)-  व्ही. पी. एज्युकेशनल कॅम्पस, कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, धाराशिव येथे 2 नोव्हेंबर 2026 रोजी महाविद्यालयाचा पहिला पदवीप्रदान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. महाविद्यालयाच्या पहिल्या तुकडीतील सात विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या पदवी प्राप्त केल्याने संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीतील हा ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण ठरला.

या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौहान उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या पंचकर्म विभागाचे विभागप्रमुख डॉ. सचिन टिके, पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य अमर कवडे उपस्थित होते. तसेच श्री सिद्धेश्वर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, सोलापूरचे प्राचार्य डॉ. सुरेश कुमार यांची सन्माननीय विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती.

संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील व व मार्गदर्शक करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फिजिओथेरपी विभागप्रमुख डॉ. पूजा आचार्य यांनी केले. पदवीधर विद्यार्थ्यांना डॉ. सायली क्षीरसागर यांनी शपथ दिली. तर डॉ. दिव्या माळी यांनी आभार प्रदर्शन केले. सुहानी शिंदे, वैष्णवी सगरे आणि मधुरा काळे यांनी सूत्रसंचालन केले. 

 

 
Top