धाराशिव (प्रतिनिधी)- भारताचे पहिले पंतप्रधान, भारतरत्न आणि आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती व बालदिन धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवार, दिनांक 14 नोव्हेंबर रोजी काँग्रेस भवन, धाराशिव येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नेते विश्वास आप्पा शिंदे,जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही नेहरूजींना अभिवादन केले.
यावेळी नेहरूजींचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, आधुनिक भारताच्या उभारणीत त्यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका, तसेच लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसारासाठी केलेल्या कार्याचे स्मरण करण्यात आले. नेहरूजींचा मुलांवर विशेष स्नेह होता. मुलांमध्येच देशाचे भविष्य घडविण्याची ताकद असून प्रत्येक बालकाला शिक्षण, संस्कार आणि समान संधी मिळाली पाहिजे, हा त्यांचा विचार होता. या कार्यक्रमास विचार मंच प्रदेशाध्यक्ष खलील सय्यद, सेवा दल प्रदेश उपाध्यक्षा तनुजा हुड्डा, शहराध्यक्ष धनंजय राऊत, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. जावेद काझी,जिल्हा सरचिटणीस शिवाजी गायकवाड, बालाजी राठोड, गोरोबा झेंडे, कानिफनाथ देवकुळे,मा.शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे,
महेबुब पटेल, प्रभाकर लोंढे,अनु.जाती सेल तालुकाअध्यक्ष ॲड. गणपत कांबळे, शहर उपाध्यक्ष अविनाश रणखांब,शहर संघटक पाशाभाई पठाण,शहर उपाध्यक्ष ॲड. राजुदास आडे, बाबा मोमीन,शहर सरचिटणीस आरेफ मुलाणी, ओबीसी शहर अध्यक्ष हरिदास शिंदे, तालुका उपाध्यक्ष ज्योतिराव निमसे, शैलेश दाने,अशोक बनसोडे, सेवा दल सेल अभिमान पेठे,युवक पदाधिकारी संकेत पडवळ यांच्यासह काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व काँग्रेसप्रेमी उपस्थित होते.
