उमरगा (प्रतिनिधी)-  सभासदांच्या विश्वासाच्या बळावर बँकेने सलग 30 वर्ष ऑडिट वर्ग अ मिळवला. स्पर्धेच्या युगात राष्ट्रीयकृत बँकेच्या बरोबरीने सुविधा उपलब्ध करून देणे व पारदर्शकता ठेवणे गरजेचे आहे. देशाचे, राज्याचे अथवा कुटुंबाचे अर्थकारण उत्तम रहाणे आवश्यक आहे. आपल्या भागात उद्योगधंदे नसल्याने रोजगार उपलब्ध नाही. जमिनीला गरजेनुसार पाणी उपलब्ध होत नाही. या सर्व अडचणींवर मात करत आपले अर्थकारण सक्षम ठेवण्याचे कठीण काम आपणास करावे लागत असल्याचे प्रतिपादन आमदार बसवराज पाटील यांनी केले.

उमरगा जनता सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या नुतन इमारतीचे भूमिपूजन मंगळवारी (दि.10) आमदार बसवराज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरगा जनता बँकेचे माजी चेअरमन रामकृष्णपंत खरोसेकर तर काशी, श्रीशैल्यम व उजैन पिठाचे विश्वस्त तथा जिल्हा बँकेचे चेअरमन बापुराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमासाठी चेअरमन शरण बसवराज पाटील, शिरिषप्पा उटगे, विठ्ठलसाई कारखान्याने उपाध्यक्ष सादिकसाहेब काझी, विठ्ठलराव बदोले, बलभिम पाटील, प्रा. बी. व्ही. मोतीपवळे, बसवराज धाराशिवे, संगमेश्वर ठेसे, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए अनुराग लड्डा आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी बँकेचे उपाध्यक्ष ॲड. विरसंगप्पा आळंगे, संचालक डॉ. दिलीप गरुड, रफिक तांबोळी, ॲड. संजय बिराजदार, ॲड. प्रवीण पणुरे, विनय बदोले, भरत मारेकर, अण्णाराव कांबळे, विठ्ठलसाई कारखान्याचे कार्यकारी संचालक सुरेश गवसाने, भाजपाचे ग्रामीण तालुकाध्यक्ष प्रल्हाद काळे, उपाध्यक्ष सतीश पवार, गौस शेख, योगेश राठोड, पप्पू सगर, सभासद, ठेविदार, विविध संस्थांचे पदाधिकारी, सर्व शाखाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुजा काळे यांनी तर मुख्य कार्यकारी अधिकारी सीए अनुराग लड्डा यांनी आभार मानले.


 
Top