धाराशिव (प्रतिनिधी)-  अतिवृष्टीमुळे मागील वर्षी झालेल्या शेतीच्या नुकसानीसह चालू वषार्तील कमी पावसामुळे निर्माण झालेल्या संकटाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघर्ष समिती धाराशिवच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शन आंदोलन करण्यात आले. समितीचे संयोजक संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कळंबसह वाशी तालुक्यातील शेतकयांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

या निवेदनात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह पीकविमा, कर्जमाफी, दुष्काळी मदत, पशुधन संवर्धन आणि शेतीमालाच्या हमीभावाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. चालू हंगामातील उसाला प्रतिटन 4 हजार रुपये दर द्यावा, पाण्याअभावी वाळलेल्या उसाचे पंचनामे करून प्रतिएकर एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, तसेच जळालेल्या उसावरील 25 टक्के वजनकपात रद्द करून संपूर्ण वजनाचे बिल द्यावे, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयेऐवजी 2 लाख रुपये अनुदान देण्यात यावे, खरीप 2026 मधील पीकविमा नुकसानीची 100 टक्के मंजुरी देऊन प्रतिहेक्टरी 50 हजार रुपये भरपाई तातडीने द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे, अशी मागणी करण्यात आली आहे.

कोरडा दुष्काळ जाहीर होऊनही अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याने शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी, गूळ पावडर कारखान्यांचाही एफआरपी कायद्यात समावेश करून उसाचे बिल एफआरपीनुसार द्यावे, नियमित कर्जफेड करणाया शेतकयांना 50 हजारांऐवजी दोन लाख रुपये अनुदान द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील पशुधन वाचविण्यासाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करावी, वायामुळे वीजवाहक तारांच्या घर्षणातून जळालेल्या उसासाठी प्रतिएकर 50 हजार रुपये भरपाई द्यावी आणि संबंधित महावितरण अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. महिला व शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून देत प्रत्येक कुटुंबाला 10 हजार रुपये दुष्काळी मदत द्यावी, दुष्काळी परिस्थिती संपेपर्यंत शेतकरी,शेतमजुरांना रेशनवर सरसकट अन्नधान्य पुरवठा सुरु करावा, आजपर्यंत झालेल्या कर्जमाफी योजनेतून वगळलेल्या पात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, विद्यार्थ्यांचे पुढील सहा महिन्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करावे, कर्जमाफीमुळे शेतकयांचा सिबिल स्कोअर खराब होऊ नये यासाठी कायदा करावा, तसेच कर्जमाफी योजनेतून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत, याशिवाय भारतीय शेतीला बाधक ठरणारा भारत-अमेरिका कृषी करार रद्द करावा, जिल्ह्यातील वाघ, बिबटे, रानडुकरे, कुत्रे आणि वानरांचा बंदोबस्त करावा, वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई द्यावी, सर्व शेतीमालाला हमीभाव देणारा कायदा मंजूर करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना वसंतराव शिंदे, ॲड.सोमनाथ शिंदे, जालिंदर शिंदे, राजेश शिंदे, समाधान शिंदे, रणजित सुतार, माधव देशमुख, कृष्णा पाटील, सतिश माने, वैभव काळे, आर.डी.कोकाटे, संदीप जाधव, आकाश जाधव, गणेश आडसुळ, भिमा हगारे, सुरेश नाईकनवरे, गणेश खराडे, अभिजीत पाटील, बजरंग डोंगरे, इक्बाल पटेल, बालाजी डोंगे, भारत शिंदे, सागर चिंचकर आदींनी मार्गदर्शन केले.

यावेळी महादेव हरिशचंद्र शिंदे, वसंत रामराव शिंदे, श्रीधर क़शिंदे, नवनाथ नागनाथ शिंदे, बाबु पाटील, मधुकर उत्तम शिंदे, युवराज शिंदे, वृक्षराज शिंदे, पिंटू पवार, आप्पासाहेब शिंदे, रामराजे शिंदे, बाळासाहेब शिंदे, गोरख कुंभार, हुनमंत पिसाळ, आश्रुबा बळवंत, रामेश्वर गळधर, नरहरी शिंदे, राजाभाऊ शेळके, बळीराम शेळके, शंकर पाटोळे, सतीश कानडे, गोविंद भैय्या माळी, विश्वजीत देशमुख, नाना केसरे, बाबु गायकवाड, अशोक आजबे, प्रशांत झाडके, किरण वाकूरे, अभिमन्यू पवार, बापू पवार, ज्ञानेश्वर झाडके, नितीन शिंदे, चाँद शेख, अक्षय कांबळे, शिवम लिपे, रोहन कांबळे, अविष्कार लिपे यांच्यासह कळंब वाशी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top