धाराशिव (प्रतिनिधी)-  अकोला येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय  तायक्वांदो शालेय क्रीज स्पर्धेत  श्रीपतराव भोसले हायस्कूलचा विद्यार्थी गणेश बाबूराव कडेकर याने 14 वर्षे वयोगटात उत्कृष्ठ कामगिरी करत कास्य पदक मिळाले. याला क्रीज शिक्षक सुनिल मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले. 

गणेशच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष सुधीर पाटील यांचे हस्ते पदक प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी श्रीहरी लोमटे, यशवंत पेठे, मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे, पर्यवेक्षक शेषनाथ वाघ, क्रीडा शिक्षक सुनिल मोहिते, सरचिटणीस प्रेमाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे उपमुख्याध्यापक प्रमोद कदम पर्यवेक्षक के.के.पाटील, के. जी. निकम, बी.बी. गुंड,  आर. बी. जाधव, बी.एम.गोरे, शरद क्षिरसागर, एस. डी. वाघ यांनी अभिनंदन केले.


 
Top