धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथील जयहिंद विद्यालय येथे नुकतीच 32 वी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद अंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये धाराशिव, कळंंब व वाशी तालुक्यातील शेकडो विद्योर्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत कामेगाव (ता. धाराशिव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थीनींनी शाश्वततेसाठी विज्ञान आणि उपक्रम या प्रकल्पाचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पास जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळाला. त्यामुळे या शाळेची आता राज्यस्तरासाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत सृष्टी मुकुंद मोरे, मयुरी रामभाऊ होनमाने या विद्यार्थीनींनी शाश्वततेसाठी विज्ञान आणि उपक्रम या प्रकल्पाचे उत्कृष्टपणे सादरीकरण केले. त्यांना मार्गदर्शक शिक्षीका नयना विलासराव देवकते व मुख्याध्यापक प्रफुल्लकुमार दुगम यांचे मार्गदर्शन लाभले. त्याबद्दल शाळेतील सहभागी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शक शिक्षीका, मुख्याध्यापक या सर्वांचे शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांच्याकडून पेन, बुके व रजिस्टर देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उपसरपंचपती राहुल कदम, ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब पाटील, बिरु शेवाळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्ता शेवाळे, उपाध्यक्ष फुलचंद रणदिवे, शालेय समितीचे सदस्य दत्ता हरिश्चंद्र कदम, दत्ता उत्तम कदम, बाळू पोंदे, प्रविण कदम, ज्ञानेश्वर कदम, लक्ष्मण कदम, कल्याण मोरे आदींची उपस्थिती होती. यावेळी उपसरपंच पती राहुल कदम यांनी सहभागी विद्यार्थिनींना प्रत्येकी दोनशे रुपये देऊन अभिनंदन केले. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेमध्ये कामेगाव शाळेची निवड झाल्याबद्दल सहभागी विद्यार्थिनी मार्गदर्शक शिक्षिका, शाळेचे मुख्याध्यापक यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांचे पालकांसह ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
