धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासन कला शिक्षण मंडळ, मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या बालचित्रकला स्पर्धेचा नुकताच निकाल जाहीर करण्यात आला; त्यामध्ये प्रशालेतील सातवीची विद्यार्थिनी कु . अंकिता शिवाजी पाटील हिने या स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला.

 या स्पर्धेसाठी तिला मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक कलाध्यापक शिवाजी भोसले, धनंजय देशमुख, शेषनाथ वाघ यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या  यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील, संस्था सचिव प्रेमाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक केशव पाटील, बी. बी. गुंड, कुमार निकम, बालाजी गोरे,राजेंद्र जाधव, शेषनाथ वाघ, शरद क्षीरसागर यांनी तिचे व तिला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. शरद क्षीरसागर यांनी तिचे व तिला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.

 
Top