तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर नगरपरिषदेत भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नगरपरिषदेचे गटनेते अमोल भ. कुतवळ आणि औदुंबर कदम यांच्या हस्ते संविधान प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यानंतर उपस्थित अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधींनी सामूहिक संविधान वाचन केले. संविधानातील मूल्ये, लोकशाही, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांचा आदर राखण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. या कार्यक्रमाला नगरसेवक रत्नदीप भैय्या भोसले यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधान दिनानिमित्त नगरपरिषद परिसरात लोकशाही मूल्यांप्रती आदर व्यक्त करण्यात आला.

 
Top