धाराशिव (प्रतिनिधी)- कांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताह 2026 कालावधी 11 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर 2026 आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहाचे धाराशिव जिल्ह्यात आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध जनकल्याणकारी उपक्रम, आरोग्य व पोषण शिबिरे, लाभार्थी मेळावे, सास्कृतिक कार्यक्रम आणि जनजागृती अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डे यांनी शुक्रवार दि. 13 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
या पत्रकार परिषदेस शिक्षण विस्तार अधिकारी भागवत आंधळकर, आदिवासी विकास निरीक्षक काशीनाथ राख, शासकीय माध्यमिक आश्रम शाळेचे सतीश गायकवाड आदी उपस्थित होते.
कांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंती निमित तसेच जनजातीय गौरव दिवसाचे ऑवित्य साधून दिनांक 11 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर 2026 या कालावधीत धाराशिव जिल्ह्यात जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या आर्थिक शैक्षणिक, सामाजिक सांस्कृतिक सक्षमीकरणासोबतच शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभापर्यत पोहोचविण्याचा प्रयन करण्यात येणार आहे. या काळात आदिवासी समाजातील लोकांचे जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, इतर आवश्यक प्रमाणपत्रे यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. धाराशिव जिल्ह्यात एकूण 70 हजार आदिवासी लोकसंख्या असून, विविध योजनेचा लाभ देण्यात आला आहे. यामध्ये रिक्षा, विट्टभट्टी, शभरी आवास योजना, जमीन सबलीकरण स्वामीनाथ योजना आदीमधून कायम रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे अशी माहिती झाकर्डे यांनी दिली.
