धाराशिव (प्रतिनिधी)- भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज 31 ऑक्टोबर रोजी अभिवादन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांना वंदन करून पुष्पहार अर्पण केले.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, धाराशिव तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक राजेश भवाळ यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांही प्रतिमांना पुष्प वाहिली. निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली.


 
Top