परंडा (प्रतिनिधी)- कपिलापुरी,ता.परंडा येथे नवीन विद्युत रोहित्र बसविण्यात आले.भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे या रोहित्राचे काम पूर्ण झाले. या नवीन विद्युत रोहित्राचे उद्घाटन युवा नेते उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले..
यावेळी युवा मोर्चा शहराध्यक्ष तथा नगरसेवक अविनाश विधाते, जिल्हा मजुर फेडरेशन संचालक बाबासाहेब जाधव, धनंजय काळे, गौरव पाटील, मनोज पवार, कल्याण घळके, बाळासाहेब मुंगळे, नितीन शिंदे, योगेश डांगे, जयघोष जैन, शरद कुलकर्णी, नागा भोसले, महेंद्र जैन आदी मान्यवर उपस्थित होते.
