येरमाळा (प्रतिनिधी)- येरमाळा परिसरातील चोरखळी येथे अज्ञात चोरट्यांनी सोमवारच्या (ता.23) मध्यरात्रीच्या सुमारास चोरी केल्याची घटना घडली. फिर्यादी तानाजी नारायण साठे (रा. चोरखळी) यांच्या मालकीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 95 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिक आणि शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार (ता.23 ) रात्री 11 वाजल्यापासून ते मंगळवार (ता.24 ) पहाटे 5 वाजेपर्यंतच्या वेळेत चोरट्यानी घरातील तानाजी साठे त्यांच्या पत्नी शेतात तुरीचे पिकं चांगले आले असल्याने पिकाची रान डुकरं नासधूस करतात त्याचे नुकसान होऊ नये म्हणून राखणीसाठी गेल्याची संधी साधतं घराची कुलप तोडून घरातील,पेट्या कपाट,घरातील पितळी डब्बे उचकून घरातील 50 ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख रक्कम सत्तर हजार रुपयांची चोरी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. चोरट्यांनी फिर्यादी यांच्या मालमत्तेवर डल्ला मारत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली.
चोरीस गेलेल्या मालामध्ये अंदाजे खरेदीच्या किमती नुसार 25 हजार रुपये किमतीचे सुमारे 50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असून त्यामध्ये गंठण, लॉकेट, नेकलेस, अंगठी, पाटली व इतर दागिन्यांचा समावेश आहे. तसेच 70 हजार रुपये रोख रक्कमही चोरीला गेली आहे. अशा प्रकारे एकूण 95 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची नोंद आहे. पुढील तपास चोराखळी बिट अमलदार पोहेकॉ रणजीत गाडे करीत आहेत.नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न दुष्काळी स्थितीमुळे ऐरणीवर आला आहे.
