तुळजापूर (प्रतिनिधी)-  परमपूज्य महंत चिलोजी बुवा गुरु हमरोजी बुवा यांच्या गादी ग्रहणाचा सुवर्णमहोत्सवी 51 वा वर्धापनदिन आणि 71 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित पेढे तुला, धार्मिक विधी, पंचब्रह्म मंत्रोच्चार आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मोठ्या उत्साहात पार पडली. साधू-संत, महंत आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास आमदार तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त राणाजगजितसिंह पाटील, उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त ओंकार देशमुख, नगराध्यक्ष विनोद गंगणे उपस्थित होते. 

या सोहळ्यास महंत तुकोजी बुवा, महंत भारतीबुवा, महंत मावजीनाथ, महंत इच्छागिरी, महंत व्यंकट अरण्या, महंत हमरोजी बुवा, महंत वाकोजी बुवा यांच्यासह पंचक्रोशीतील साधू-संत आणि महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.  यावेळी बोलताना आमदार राणाजगजीतसिंह पाटील म्हणाले यांनी महंत चिलोजी बुवा यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळगे, प्रशासकीय अधिकारी माया माने, उपाध्यक्ष अनंत कोंडो, प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रो चकरी   पुजारी मंडळ संचालक नरेश अमृतराव प्रशांत सोंजी  यांच्यासह उपनगराध्यक्ष, नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर, वकील आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे पौरोहित्य उपाध्ये माणिक काका कांबळे यांनी केले. सोहळ्यानंतर उपस्थित सुमारे पाच हजार भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या दिव्य सोहळ्याच्या यशस्वितेसाठी संयोजक महंत तुकोजी बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री तुळजाभवानी प्रक्षाळ मंडळ, श्री तुळजाभवानी चरणतीर्थ आईसाहेब सेवा समिती तसेच विविध मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


 
Top