धाराशिव (प्रतिनिधी)-  येडशी येथील किराणा दुकानास आग लागून मरण पावलेल्या करंडे कुटूंबातील वारसांना शरण पाटील फाउंडेशन, मुरूम तर्फे 2 लाखाची आर्थीक मदत विधान परिषद आमदार बसवराज पाटील यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आली. 

दि.09 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास येडशी येथील गोविंद करंडे यांच्या किराणा दुकानाला व त्याच दुकानच्या वरच्या राहत्या घराला ऐन दिवाळीत शॉट सर्किटमुळे आग लागल्याने  करंडे कुटूंबातील उत्तम त्रंबक करंडे, चंद्रकला उत्तम करंडे (आजी आजोबा) गोविंद उत्तम करंडे व ज्योती गोविंद करंडे (पती पत्नी) आणि दिवाळीनिमित्त बाहेरगावातून आलेल्या सिध्दी गोविंद करंडे आणि गायत्री गोविंद करंडे या दोन मुलीसह 6 जणांचा मृत्यू झाला होता. या दूरघटनेतून सुदैवाने वाचलेला कृष्णा गोविंद करंडे, येडशीचे उपसरपंच पिंटु करंडे यांना शरण पाटील फाउंडेशन मुरूम यांच्याकडून 2 लाखाची आर्थीक मदत विधान परिषद आमदार बसवराज पाटील यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आली. यावेळी धाराशिव जिल्हा अनु.जाती.मोर्चाचे अध्यक्ष दिलीप भालेराव, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश आष्टे, जि.प.सदस्य दादा शितोळे पाटील, ओबीसी मोर्चा अध्यक्ष दादा घोडके, आशिष मोदाणी, सिध्दार्थ बनसोडे नगरसेवक, दर्शन कोळगे,कमलाकर पाटील, हरीभाऊ जाधव, धनंजय पाटील, शशांक सस्ते,विजय सस्ते, प्रशांत पवार,संजय लोखंडे,निवासी जिल्हाधिकारी कडवकर, एस.डी.ओ. मृणाल जाधव तहसीलदार आदि उपस्थित होते.

 
Top