धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या स्तरावर कोणत्याही टप्प्यावर प्रलंबित असलेली अपील प्रकरणे त्वरित निपटारा करण्यासाठी 19 नोव्हेंबर रोजी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात सकाळी 11 वाजल्यापासून महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतीचा लाभ घेऊन नागरिकांनी आपल्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करून घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून तसेच त्यांच्या सामाजिक न्याय व शेतकरी कल्याणाच्या मूळ विचारांना स्मरून महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत अभियान राज्यभरात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दर तीन महिन्यांतून एकदा लोक अदालतीचे नियमित आयोजन केले जाणार आहे. त्यानुसार जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या स्तरावर कोणत्याही टप्प्यावर प्रलंबित असलेली अपील प्रकरणे त्वरित निपटारा करण्यासाठी 19 नोव्हेंबर रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

 
Top