धाराशिव (प्रतिनिधी)-  पुण्यामध्ये होणाऱ्या 100 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या एतिहासिक पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये 99 वे नांदी साहित्य संमेलन 29 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन प्रसिध्द नाटककार, लेखक, अभिनेत योगेश सोमण यांच्या हस्ते होणार असून, संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक राजेंद्र अत्रे राहणार आहेत. तर स्वागताध्यक्ष म्हणून आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांची उपस्थिती राहणार आहे. अशी माहिती संमेलनाचे निमंत्रक युवराज नळे यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवार दि. 27 नोव्हेंबर रोजी दिली. 

या पत्रकार परिषदेस राजेंद्र अत्रे, साहित्य भारतीचे भैरवनाथ कानडे, सुनिता गुंजाळ, रविंद्र शिंदे, देविदास पाठक आदी उपस्थित होते. एकदिवसीय होणारे हे साहित्य संमेलन धाराशिवमधील प्रशासकीय मध्यवर्ती इमारत जवळील सामाजिक न्याय भवन येथे होणार आहे. सकाळी 8.30 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमास पुणे मराठी साहित्य परिषदेचे प्राचार्य डॉ. संजीव गिरासे, साहित्य भारतीचे नितीन केळकर, देवगिरी प्रातांध्यक्ष सर्जेराव जिगे पाटील, उमेश काळे, डॉ. विनायक हेगाणा, डॉ. दिपक सुर्यवंशी, राजेंद्र इदगे, प्रा. डॉ. महेश खरात आदी उपस्थित राहणार आहेत. 


 
Top