धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील ठिकाणी धाराशिव जिल्हा संस्कार भारतीच्या वतीने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्यालयच्या वतीने एकपात्री नाटय कलावंत 2025 पुरस्कार धाराशिव जिल्हा चोराखळीचे भुमीपुत्र रंगकर्मी विक्रांत शिंदे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, संस्कार भारती दैनंदिनी 26-27 देऊन सत्कार करण्यात आला. 

या प्रसंगी देवगिरी प्रांत दृष्य कला संयोजक शेषनाथ वाघ, जिल्हा संरक्षक अनिल ढगे ,प्रभाकर चोराखळीकर, जिल्हा अध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, जिल्हा संगीत संयोजक सुरेश वाघमारे, नाटय संयोजक अनिल मालखरे , अक्षय भन्साळी, धनंजय कुलकर्णी,श्री चित्रपट गृह चालक आदित्य गोरे, प्रगती पतसंस्था उपाध्यक्ष श्याम जाधव उपस्थित होते. सत्कार मनोगतात विक्रांत शिंदे यांनी राज्य शासन, संस्कार भारतीचे आभार मानले. भविष्यात जिल्हाभर शाळेतून एकपात्री सोडली शाळा.. झाला घोटाळा नाटकाचे प्रयोग मोफत करून समाज प्रबोधन करण्याची ग्वाही दिली.


 
Top