धाराशिव (प्रतिनिधी)- सातेफळ तालुका कळंब येथील ग्रामीण साहित्यिक दिलीप कांबळे यांनी गेली 40 वर्ष साहित्यिक ,सामाजिक, शैक्षणिक ,सांस्कृतिक, क्षेत्रात समाज हितासाठी निस्वार्थीपणे केलेल्या विशेष कार्याची दखल घेऊन काव्यांगण साहित्य मंच महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा आदर्श समाजसेवक पुरस्कार 2026 हा ज्येष्ठ साहित्यिक व्याख्याते सुभाष सोनवणे (अहिल्यानगर), सुवर्णाताई पवार गीतकार कवयित्री (इचलकरंजी), ज्येष्ठ साहित्यिक भूमिपुत्र वाघ यांचे हस्ते तसेच डॉक्टर संजय राठोड, प्राचार्य बी पी सिंग, काव्यांगण साहित्य मंचेचे संस्थापक अध्यक्ष विकास राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी उमरगा येथे वितरित करण्यात आला. या राज्यस्तरीय पुरस्काराने दिलीप कांबळे यांना सन्मानित केल्याबद्दल त्यांचे मित्र परिवारातून अभिनंदन होत आहे.
