तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील कनगरा येथे 2 ऑक्टोबरला ग्रामपंचायतीची ग्रामसभा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आयोजित करण्यात आली. ग्रामसभेसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी नलावडे, कृषी अधिकारी पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत पंचायत अधिकारी उमेश राठोड, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
