धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्रातील तुघलकी सरकारने युपीआयवर लादलेल्या (एमडीआर) कराच्या निर्णयाचा धाराशिव जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी तीव्र निषेध केला. शुक्रवारी सर्व क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी काळया फिती लावून 'नो युपीआय डे' पाळला. व्यापाऱ्यांची छळवणूक करणारा हा तर जिझीया कर आहे. तो त्वरित मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा व्यापारी महासंघाने दिला आहे.

व्यापारी संघटनांना विचारात न घेता केंद्र सरकारने युपीआयवर हा कर लादला आहे. विशेष म्हणजे एकीकडे डिजिटल व्यवहाराला चालना देण्याची भाषा करणाऱ्या सरकारने युपीआयवर कर लादणे ही ग्राहक आणि व्यापाऱ्यांची फसवणूक आहे. आज मोठ्या प्रमाणावर व्यवहार हे युपीआयवर होत असताना आणि बँकावरील व चलनी नोटांच्या छपाईवर होणारा खर्च कमी होत असताना सरकारची ही कर लादण्याची पद्धत जाचक आहे. त्यामुळेच या निर्णयाचा निषेध करण्यात आला.

यामध्ये जिल्हा व्यापारी महासंघाच्या नेतृत्वाखाली मशीनरी, ड्रीप व टूल्स असोसिएशन, मुद्रक संघटना,पेट्रोल पंप असोसिएशअसोसिएशन, फर्निचर व इलेक्ट्रॉनिक्स, सराफ व सुवर्णकार संघटना, हॉटेल व बेकरी संघटना, स्टील व बिल्डिंग मटेरियल असोसिएशन, किराणा असोसिएशन, हॉटेल आणि बार असोसिएशन या प्रमुख संघटनाचा सहभाग होता.

 
Top