धाराशिव (प्रतिनिधी)- रुपामाता अर्बन मुख्य शाखा, धाराशिव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा व स्वच्छतेच्या विचारांचे तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या ‘जय जवान, जय किसान’ या प्रेरणादायी घोषणेचे स्मरण करण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एस. एस. बोधले, प्रशासकीय अधिकारी श्री. व्ही. एस. गुंडपाटील, शाखा व्यवस्थापक श्री. एन. डी. सूर्यवंशी यांच्यासह गवाड एस. डी., स्वामी एस. एस., खराडे जी. एस., जाधव पी. डी., पाटील ओ. एन., जमदाडे ए. पी., चिंचुरे पी. व्ही., शिंदे एच. के. तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या राष्ट्रसेवा, साधेपणा, प्रामाणिकपणा आणि देशभक्तीच्या विचारांना अभिवादन केले.
