तुळजापूर (प्रतिनिधी)-  महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्र महोत्सवाचा धार्मिक विधीचा सांगता सोम छबिना संपन्न झाल्यानंतर वाकोजी बुवा गुरु तुकोजी गोवा यांनी उपरण्यात जोगवा मागितल्यानंतर सांगता झाला. तर मंगळवारी अन्नदान महाप्रसाद कार्य कम सुंपन्न झाला. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या प्रारंभापासून विविध धार्मिक विधी आणि धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.

सोमवारी रात्री सोलापूरच्या मानाच्या काठ्यांसह श्री तुळजाभवानी देवींची छबीना मिरवणूक काढण्यात आली. तसेच, महंत वाकोजीबुवा यांच्याकडून प्रथा-परंपरेनुसार जोगवा मागण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील, पोलीस निरीक्षक बालाजी येवते, लेखाधिकारी संतोष भेंकी, सहायक व्यवस्थापक (सामान्य) जयसिंग पाटील, सहायक व्यवस्थापक (प्रशासन) नागेश शितोळे, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, रामेश्वर वाले, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, पुजारी, सेवेकरी, मानकरी आणि भाविक उपस्थित होते.

 मंगळवारी अन्नदान महाप्रसादाने श्री तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता झाली. आज रात्री देखील सोलापूरच्या मानाच्या काठ्यांसह श्री तुळजाभवानी देवींची छबीना मिरवणूक काढण्यात आला.

 
Top