उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा शहरातील श्रमजीवी अध्यापक महाविद्यालय येथे राष्टपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. विजय सरपे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी महात्मा गांधीजीनी सांगितलेल्या “विद्यार्थ्यांनो, सत्य, अहिंसा, शिस्त आणि स्वावलंबन यांचा मार्ग स्वीकारा. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा आपल्या जीवनाचा आधार बनवा. शिक्षण केवळ पदवी मिळवण्यासाठी नव्हे, तर स्वतःचा आणि समाजाचा विकास करण्यासाठी घ्या. देशाच्या प्रगतीसाठी जबाबदार, संवेदनशील आणि चारित्र्यसंपन्न नागरिक बना. लालबहादूर शास्त्री यांनी सांगितलेल्या “विद्यार्थ्यांनो, देशाचे भविष्य तुमच्या हातात आहे. शिक्षणासोबत शिस्त, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि साधेपणा अंगीकारा. मेहनतीला पर्याय नाहीस्वतःच्या प्रगतीसोबत देशाच्या प्रगतीलाही हातभार लावा. देशसेवा, स्वावलंबन आणि जबाबदारीची भावना मनात रुजवा.” या विचारांना प्राचार्य डॉ. विजय सरपे यांनी उजाळा दिला. या वेळी प्रा. डॉ. कदम प्रवीणकुमार, प्रा. पवार भाऊ, प्रा. चव्हाण देविदास, प्रा. करंडे तेजस्विनी, सुरवसे दगडू, प्रथम व द्वितीय वर्षातील प्रशिक्षणार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
