धाराशिव (प्रतिनिधी)- मयत नामे-यशराज श्रीकृष्ण चव्हाण, वय 19 वर्षे, रा. लक्ष्मीनगर भुम ता. भुम जि. धाराशिव हे दि.29.09.2026 रोजी 14.45 वा. सु. स्कुटी क्र एमएच 25 बीएच 5581 वरुन जात होते. दरम्यान तेरखेडा येथे वनविभागाचे जागेसमोर एनएच 52 रोडवर अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन ही हायगईने व निष्काळजीपणे चालवून यशराज चव्हाण यांचे स्कुटीला समोरुन धडक दिली. या अपघातात यशराज चव्हाण हे गंभीर जखमी होवून मयत झाले. नमुद अज्ञात वाहन चालकाने जखमीस उपचार कामी घेवून न जाता निघून गेला. अशा मजकुराच्या फिर्यादी श्रीकृष्ण रामलिंग चव्हाण, वय 42 वर्षे, रा. लक्ष्मीनगर भुम ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.30.09.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

सदर गुन्ह्यातील तपासा दरम्यान घटनास्थळाची येरमाळा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेने पाहणी केली असता तांत्रिक विश्लेशनाचे आधारे सदर वाहन राजेशनगर ढोकी येथील असुन त्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव यांना मिळाल्याने पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपी  शुभम अच्युत काळे, वय 22 वर्षे,  रा. राजेश नगर ढोकी ता. जि. धाराशिव अशोक लिलॅण्ड टेम्पो क्र एमएच 47 वाय 3425 त्याबात घेवून पुढील कार्यवाही कामी येरमाळा पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, सपोनि यशवंत घोडके, पोलीस ठाणे येरमाळा, पोह शौकत पठाण, पोह प्रकाश औताडे, पोह जावेद काझी, पोह फरहान पठाण तसेच चापोह नागनाथ गुरव,रत्नदिप डोंगरे, पोह शिवाजी घाडगे पोलीस ठाणे येरमाळा यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.


 
Top