धाराशिव (प्रतिनिधी)- विवाह सोहळ्यानंतर सामाजिक व धम्म संस्कृतीचा आदर्श जपत नवविवाहित आयु. तेजस व आयु. समीक्षा यांनी प्रथम विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेतील तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस वंदन केले. नवविवाहित जोडप्याने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून तथागत गौतम बुद्धांच्या मुर्तीस वंदन केल्याने समता,स्वातंत्र्य, बंधुता, करुणा आणि मानवतेच्या विचारांना अभिवादन करणारा संदेश दिला आहे. भारतीय संविधानातील मुल्यांची जपणुक करत महापुरुषांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे. अशा कृतीतुन सामाजिक प्रबोधनाला चालना मिळते.असे मनोगत समितीचे अध्यक्ष गणेश रानबा वाघमारे यांनी करुन विवाहित नवदाम्पत्यांस समितीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी समितीचे अध्यक्ष गणेश रानबा वाघमारे, सदस्य अतुल लष्करे, विवाहित दाम्पत्य भालेराव परिवार सह इतर उपस्थित होते.
