धाराशिव (प्रतिनिधी) - आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 15 मधील फकीरा नगरमधील मातंग समाज मंदिर सभागृह बांधकाम तसेच अंतर्गत नागरी रस्त्याचे आणि रसुलपुरा भागातील जफर किराणा घर ते जुबेर पठाण घर रस्ता कामांचे उद्घाटन नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या हस्ते आणि बांधकाम सभापती अभिजीत काकडे, पाणी पुरवठा सभापती विलास लोंढे, नगरसेवक राजकन्या अडसुळे गोरे, दाजीअप्पा पवार आणि सिद्धार्थ बनसोडे यांच्या उपस्थितीत दि.30 ऑक्टोबर रोजी करून विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील रखडलेल्या रस्ता व समाज मंदिर सभागृह बांधकाम आदी विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या विकास कामांमध्ये फकीरा नगरमधील मातंग वस्तीमध्ये समाज मंदिर सभागृह व अंतर्गत रस्ता आणि रसुलपुरा भागातील जफर किराणा घर ते जुबेर पठाण घर रस्ता कामांचे समावेश असून त्याचे उद्घाटन श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी भाजपा नेते दत्ता पेठे पृथ्वीराज दलनायक, अप्पा धावारे, दादा वाघमारे,  शिवाजी क्षिरसागर, अमित बनसोडे, अरुण पेठे, रॉबिन बगाडे, मिलींद पेठे, सचिन पेठे, अजय देवकुळे आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top