परंडा (प्रतिनिधी) - तालुक्यातील आसू येथील चांदणी विद्यालयाचे सहशिक्षक सर्जेराव भुजंग गरड यांना बी द चेंज फाउंडेशनच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिर्डी येथे २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा २०२६ मध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, अध्यापनातील समर्पण तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले अथक परिश्रम यांची दखल घेऊन गरड यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. गिफ्ट, सन्मानचिन्ह (ट्रॉफी) आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गरड यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रताप घुटे, जिजामाता शाळेचे शिक्षक नितीन पाबळे, मूकबधिर विद्यालय बार्शी येथील शिक्षक अमोल गवारे तसेच चांदणी विद्यालय आसू येथील शिक्षक पाबळे यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
त्यांच्या या यशामुळे चांदणी विद्यालयासह परंडा तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, मित्रपरिवार, सहकारी शिक्षक आणि शिक्षणप्रेमींकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
