धाराशिव (प्रतिनिधी)- नॅचरल शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि. साईनगर रांजणी कारखान्याचे सभासदांना येता दिवाळी सण उत्साहाने व आनंदाने साजरा करता यावा म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांचे भागाचे प्रमाणात 35 रुपये प्रति किलो या सवलतीचे दरात शंभर शेअर्ससाठी 10 किलो प्रमाणे एकूण शेअर्सधारण संख्येच्या प्रमाणात साखर वाटप करण्यात येत आहे. दि. 28 ऑक्टोबर 2026 ते 06 नोव्हेंबर 2026 या कालावधीत सकाळी 09 ते सायंकाळी 06 या वेळात कारखान्याचे शेती विभागाच्या गट कार्यालयामधून साखर वाटप करण्यात येत आहे. तसेच नॅचरल डेअरी मार्फत गाईचे शुध्द तुप सवलतीचे दरात 600 रुपये प्रति लिटर प्रति सभासद एक, अर्धा लिटर या प्रमाणे वाटप करण्यात येत आहे.
नॅचरल शुगरचे सर्व सभासदांनी संबंधीत गट कार्यालयाशी संपर्क साधून आपली साखर व तुप निर्धारीत मुदतीत घेऊन जावे व वाटपासाठी सहकार्य करावे असे आवाहान नॅचरल उद्योग समुहाचे अध्यक्ष कृषीरत्न बी. बी. ठोंबरे यांनी केले. तसेच साखर घेण्यासाठी येताना सभासदांनी ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, भाग प्रमाणपत्र सोबत आणावे असेही कळविण्यात आले आहे.
