धाराशिव (प्रतिनिधी)- वकील नागरी सहकारी पतसंस्थेची 24 वी अधिमंडळाची सर्वसाधारण सभा शहरातील शिवगौरी फंक्शन हॉल धाराशिव येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सभेत जिल्हा विधिज्ञ मंडळ, धाराशिवचे अध्यक्ष ॲड. खंडेराव चौरे, चेअरमन ॲड. राजेंद्र धाराशिवकर संचालक ॲड रामचंद्र गरड, ॲड. रमेश वट्टे ॲड. संजय बिराजदार तसेच संस्थेच्या सचिव माधुरी जाधव यांनी प्रथम दीप प्रज्वलन करून सभेला सुरुवात केली सचिव यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल सादर केला धाराशिव उमरगा आणि भूम शाखेचा लेखाजोखा मांडला ते म्हणाले यावर्षी संस्थेच्या ठेवी 12 कोटी 94 लाख असून कर्जवाटप 7 कोटी आहे.यावर्षी संस्थेची उलाढाल 762 कोटी असून निव्वळ नफा रु10 लाख 24 हजार रुपये झाला असून संस्थेच्या अध्यक्षांनी सभासदांना 12% लाभांश जाहीर करण्यात आला. तसेच संस्थेला ऑडिट वर्ग अ मिळालेला आहे त्यास सभेने मंजुरी दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड राजेंद्र धाराशिवकर यांनी पुढील प्रगतीचा आढावा घेतला.
