तेर(प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील सिद्राम सलगर यांच्या म्हशीने लोखंडी वायसर  पोटात गेले होते. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाच्या पद्धतीने म्हशीच्या पोटातील लोखंडी वायसर काढल्याने म्हशीचे प्राण वाचले.

तेर येथील सिद्राम सलगर यांच्या म्हशीने चारा खाताना कांहीं दिवसांपूर्वी लोखंडी वायसर पोटात गेले होते. त्यामुळे म्हशीला चारा खाता येत नव्हता.पोट फुगत होते.प्रकृत्ती ढासाळत चालली होती.तेर येथील पशुधन व्यवस्थापन व दुध उत्पादन पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेले सोमनाथ हेगडकर यांनी म्हशीला तपासल्यावर मेटल डिटेक्टर यांनी तपासणी केली असता लोखंडी वस्तू असल्याचे समजले.यानंतर अन्ननलिकेतून लोहचुंबक टाकल्यावर लोहचुंबकाला लोखडी वायसर चिटकून आले.आधुनिक तंत्रज्ञानाच्या पद्धतीचा सोमनाथ हेगडकर यांनी वापर करून म्हशीच्या पोटातील लोखंडी वायसर  काढल्याने म्हशीचा प्राण वाचला.


 
Top