शिराढोण (प्रतिनिधी)- येथील शेतकरी अंनिस मजारोद्दीन दखणी यांच्या शेतात येडेश्वरी साखर कारखान्याची ऊस तोडणी सुरू होती.या ऊसाची ट्रॅक्टर मधे भरणी करण्यात आली दरम्यान भरलेली ट्राली बाहेर काढताना शेजारी असलेल्या औदुंबर उर्फ भाऊराव ज्ञानदेव जाधवर यांचे शेत आहे. या शेतातील अंदाजे 70 फूट खोल असलेल्या विहिरीत शुक्रवारी (ता 23)सकाळी ट्रॅक्टर व ट्राली कोसळली यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी आहे.
शेतातून ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली आणि दोन हेड घेऊन जात असताना ट्रॅक्टरसह संपूर्ण साहित्य विहिरीत पडल्याची घटना शुक्रवारी (दि. 23) सकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास शिराढोण शिवारात घडली. या घटनेत चंद्रकांत दिनेश कांबळे (रा. इस्थळ, ता. केज, जि. बीड) हे जखमी झाले आहेत. त्यांना विहिरीतून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. दरम्यान, विहिरीतील पाण्यात अडकलेला ट्रॅक्टर, ऊसाने भरलेली ट्रॉली आणि दोन हेड बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
शिराढोण शिवारातील शेत गट क्रमांक 116 मध्ये औदुंबर उर्फ भाऊराव ज्ञानदेव जाधवर यांचे शेत आहे. या शेतातील अंदाजे 70 फूट खोल असलेल्या विहिरीत शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. गणेश पांडुरंग टेकाळे (वय 26, रा. डोळा पिंपळगाव, ता. कळंब, जि. धाराशिव) यांच्या मालकीचा जॉन डिअर कंपनीचा ट्रॅक्टर (क्रमांक एमएच-25-डीजे-0954) ऊसाने भरलेल्या ट्रॉलीसह जात असताना विहिरीत पडला. त्यासोबत स्वराज 855 चे दोन हेडदेखील विहिरीत पडले.दरम्यान या अपघातात गणेश टेकाळे यांचा मृत्यू झाला.
पोलीस व महसूल प्रशासन घटनास्थळी
दरम्यान घटनेची माहिती मिळताच शिराढोण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तहसीलदार हेमंत ढोकळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक राम घाडगे, मुख्य अंमलदार परमेश्वर मेंगले तलाठी विनोद चुक्केवाड घटनास्थळी उपस्थित होते.यावेळी विहीरीत पडलेल्या दोघांना बाहेर काढण्यासाठी येथील युवक शेतकरी विनोद नान्नजकर यांनी शर्थीचे प्रयत्न करुन जखमींना विहीरीतील 25 फुट पाण्यातून बाहेर काढण्यासाठी पुढाकार घेतला. पुढील तपास परमेश्वर मेंढरे करत आहेत.
