तुळजापूर (प्रतिनिधी)- सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता ई पीक पाहणी आधारित दुष्काळी अनुदान येण्याची शक्यता आहे. तरी यासाठी तुळजापूर रुरल शिवारातील सर्व शेतकरी बांधवांनी आपापल्या शेतातील पिकांची नोंद DCS MH या ॲपमध्ये करणे बंधनकारक आहे. जे शेतकरी ई पीक पाहणी करणार नाहीत ते अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. तरी सर्वांनी लवकरात लवकर आपली ई पीक पाहणी करून घ्यावी..
तसेच ई पीक पाहणी करण्यासाठी आणि इतर अनुदान यासाठी ऍग्रीस्टॅक फार्मर आयडी बंधनकारक असल्यामुळे ज्यांनी अजूनपर्यंत फार्मर आयडी काढलेला नसेल त्यांनी नजिकच्या सीएससी सेंटरवर जाऊन आपला फार्मर आयडी काढून घ्यावा.
पीक पाहणी साठी काही अडचण आल्यास आपल्या गावातील खालील पीक पाहणी सहाय्यक यांना संपर्क साधावा. रवी शेरेकर गट नंबर 01 ते 170, नितीन पवार गट नंबर 171 ते 222 असे आवाहन शरद दूधवाते ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, तुळजापूर रुरल यांनी केले आहे.