धाराशिव (प्रतिनिधी)- दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी सणानिमित्त तात्पुरते फटाके विक्री स्टॉल उभारण्यासाठी आवश्यक परवानगीचे अर्ज 7 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
तात्पुरत्या फटाके विक्री स्टॉलच्या परवानगीसाठी अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत.
विहित नमुन्यातील अर्ज.
फॉर्म -5.ओळखपत्र आधार कार्ड, पॅनकार्ड,मतदान ओळखपत्र इत्यादी.संबंधित ग्रामपंचायत, नगर परिषद किंवा नगरपंचायतीचे ना-हरकत प्रमाणपत्र. संबंधित ग्रामपंचायत, नगर परिषद किंवा नगरपंचायतीचा साक्षांकित नकाशा.संबंधित जागा खासगी असल्यास जागामालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र व जागेची कागदपत्रे.संबंधित पोलीस स्टेशन किंवा पोलीस ठाण्याचे ना-हरकत प्रमाणपत्र.विहित परवाना शुल्काचा भरणा केल्याचे चलन. इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.
वरील सर्व आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण असलेले प्रस्तावच जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकारले जातील. तसेच,विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.त्यामुळे तात्पुरते फटाके विक्री स्टॉल सुरू करण्यास इच्छुक अर्जदारांनी 31 ऑक्टोबर 2026 पूर्वी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.