भूम (प्रतिनिधी)- लोकसंख्या शिक्षण प्रकल्प 2026 अंतर्गत आयोजित विभागस्तरीय लोकनृत्य स्पर्धा व भूमिका अभिनय स्पर्धा दि. 29 सप्टेंबर रोजी लातूर येथील जय क्रांती महाविद्यालया मध्ये उत्साहात पार पडल्या.

या स्पर्धेमध्ये वाशी येथील  जे.आय.आर.टी. तंत्र प्रशालेमधील  इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी पर्यावरण संवर्धन या विषयावर आकर्षक व संदेशपूर्ण लोकनृत्य सादर केले. त्यांच्या या उत्कृष्ट सादरीकरणामुळे त्यांनी विभागस्तरावर तृतीय क्रमांक पटकावून शाळेचा गौरव वाढविला.

विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्यकलेतून भारतीय संस्कृतीचे जतन करताना पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला. तसेच भूमिका अभिनय स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी सामाजिक विषयांवर आधारित प्रभावी अभिनय सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. सदर स्पर्धेमध्ये नांदेड व लातूर जिल्ह्यातील विविध गटांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सौदागर बामणे व विज्ञान शिक्षिका  पुनम गौतम चेडे  यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल सर्व स्तरांतून विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

 
Top